ती आणि मी…

Ruchira More
2 min readFeb 21, 2018

“ती”… विसरला नाहीत ना तिला..

“ती” काल काय झालं याची फिकीर न करणारी आणि उद्या काय होईल याची काळजी न करणारी.. फक्त आज हेच तीच आयुष्य आहे. आणि फक्त आज हेच तीच जीवन..

कस जमत तिला एवढा सरळ विचार करणं?.. आजचा फक्त विचार करून जगणं?..

तिला काळजी नाहीये तिच्या भविष्याची?.. का तिला भीती नाहीये कालच्या दुःखांची?..

समजत नव्हतं तिला कस उलघडावं.. समजत नव्हतं तिला कस जाणून घ्यावं..?

एका बाजूने ती आजची लढणारी स्त्री भासते.. तर दुसऱ्याबाजूने तेवढीच बेफिकीर..

तिची खरी बाजू कोणती? “ती” खरंच स्वतःला कोणत्या बाजूला मांडतेय..?

मनात प्रचंड कल्लोळ उठला.. जाऊन प्रत्यक्ष बोलायचं का? शेवटी मनातल्या प्रश्नांवर आवर घालत थेट भेटून, मी माझ्या खोचक प्रश्नांनी तिला विचारलं, “इतकी कशी बेफिकीर ग तू?.. राहण्याचं ठिकाण नाही? स्वतःची काळजी नाही? भविष्याची चिंता नाही”..?

यावर तिचे फक्त हसू मला उत्तरात मिळाले.. आता यावरून मी काय समजायचे? नक्की तिने मला काय सांगायचं प्रयत्न केला? परत माझ्या मनात प्रश्नांची गाडी चालू झाली.. हि मला कधी विचार करायला थांबवणारेय..?

मी परत मला थोडं आवरून तिला विचारले अगं हसतेस काय? मी काहीतरी विचारतेंय.. तुला काही विचार करावासा वाटतं नाही का स्वतःचा?

यावर ती फक्त एवढच म्हणाली, “कशाला?”

आता मला परत मनात प्रश्नांची गाडी सुरु करायची नव्हती.. माझे थेट तिलाच प्रश्न सुरु..

तीच आयुष्य.. तिची राहण्याची पद्धत. तीच वागणं.. तीच खाणं.. प्रत्येक गोष्टीवर मी बोट ठेवायचा प्रयत्न केला..

पण या सगळ्यात मी विसरून गेले कि ती हि “ती” आहे..

स्वतःला मुठीत बंद करून न ठेवणारी.. स्वछंद आभाळाला गवसणी घालणारी.. स्वतःला आज मध्ये पाहणारी..

तिचे हातावरचे पोट असले, तरी कधी कुठली तिला उणीव न भासणारी..

कस शक्य आहे हे.. ती सुद्धा एक स्त्री आहे आणि तिच्या काहीच अपेक्षा नाहीत? साधारण मला लाजवणारा प्रश्न होता हा..

तिचे उत्तर ठरलेले.. जगाला माझी गरज नाही.. मला जगाची गरज नाही.. मग विचार करून जायचं कुठं..? काल हि आज होता आणि उद्या हि आज च आहे.. जर यामध्ये काही बदल होणार नसेल तर स्वतःला न स्वतःमुळे दुसऱ्याला तरी का त्रास द्यायचा..?

नक्की हि काय सांगायचा प्रयत्न करतेय..?

भेटू परत “पुन्हा ती आणि मी”…

https://medium.com/@RuchyaM/%E0%A4%A4%E0%A5%80-f2a251a89f66

--

--

Ruchira More

Software Developer, Writing Tech+Life and much in between | Grow With Flow… Love Life…😊